मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज संध्याकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.


राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा या लढ्यात सहभागी झाली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा राज्यपालांना विधानपरिषदेच्या जागेबाबत मंत्रिमंडळ ठराव पत्र आम्ही सुपूर्द केले असल्याची माहिती जयंत पाटलांनी ट्वीट करुन दिली आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, अनिल परब आदी नेते उपस्थित होते.


राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा





विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर आमदार करावे, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याविरोधात हायकोर्टात याचिका


Sanjay Raut Twit On Governor | राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, खासदार संजय राऊतांचं ट्वीट