मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात 19 घरे जी 23 हजार 500 स्केअर फूटाची आहेत ती दाखविलेली नाहीत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. मुंबईतल्या भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.


रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने या प्रतिज्ञापत्रकात फक्त अन्वय नाईक कुटुंबाकडून तीस जमिनी (सात बारा) चे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ठाकरेंनी भासवले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात 19 घरे जी 23 हजार 500 स्केअर फूटाची आहेत. ज्याची किंमत 5.29 कोटी आहे. ती दाखविलेली नाही. ठाकेंनी ही एवढी घरे, संपत्ती ही जनतेपासून लपवली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 11 नोव्हेंबर, 2020 रोजी उद्धव ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक कुटुंब यांचे जमिनी संबंधी आर्थिक व्यवहारासंबंधीचा खुलासा केला होता. शिवसेनेच्या डझनभर नेत्यांनी मला धमक्या दिल्या होत्या, असा दावाही सोमय्यांनी केला.


शाहिद बालवा, अविनाश भोसले बिल्डर्सना ठाकरे सरकारचे नवीन वर्षाचे गिफ्ट, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप


हे मिशन सुरुच राहणार : किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे कुटुंबाचे अपारदर्शक जमिनी, बिल्डर, आर्थिक व्यवहार जनते पुढे आणण्याचे मिशन सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. 11 नोव्हेंबर 20 रोजी ठाकरे, नाईक परिवाराचे जमिन व्यवहार उघडकीस आणल्यानंतर 12 नोव्हेंबर, 2020 ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च, 14 ते 12 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या त्या जमिनीवरील 19 घरांचा, घरपट्टी कर व अन्य कर ताबडतोब आरटीजीएसद्वारे सरकारी खात्यात, कोर्लई ग्रामपंचायत यांच्या खात्यात भरला. असा दावाही सोमय्यांनी केला आहे. यासंदर्भात पुढच्या सोमवारी, म्हणजे 11 जानेवारी 2021 रोजी आम्ही निवडणूक आयोग, राज्य सरकारचे महसूल विभाग व अन्य विभागात तक्रारी दाखल करणार आहोत असं सोमय्यांनी सांगितलंय.