मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील गुंडगिरीवर हल्लाबोल केला. इकडे आम्ही विकासावर बोलतोय तर तिकडे एका पक्षाच्या कार्यक्रमात बंदुका निघतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

गुंदवली-कापूरबावडी-भांडुप संकुल भूमिगत जलबोगद्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

युतीच्या कारभावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युतीचं सरकार विकासाची कामं करत आहे. मात्र दुसरा पक्षा कार्यक्रमात बंदुका आणि तलवारी काढत आहे. हाच दोन्ही पक्षांमधील मूलभूत फरक आहे.

दरम्यान, मुंबईतल्या चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या. मेळाव्यात धुडगूस घातल्याप्रकरणी नवाब मलिक आणि संजय दिना पाटलांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

संजय दीना पाटील आणि नवाब मलिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा


राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार