मुंबई: नोटबंदीनंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला नोकरदारांचे पगार करण्याचं मोठं आव्हान बँकांसमोर आहे.

बँकांना पतपुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह बँक कामाला लागली आहे. मात्र नोटाबंदीला येत्या 9 तारखेला महिना होत असताना, बँकांबाहेरील रांगा अद्याप कायम आहेत.

सध्या तुमच्या परिसरातील एटीएमची स्थिती काय आहे? एटीएममध्ये पैसे आहेत का? एटीएममध्ये केवळ दोन हजाराचीच नोट आहे की अन्य नोटाही उपलब्ध आहेत? एटीएमबाहेरील रांग किती लांब आहे? आणि एटीएमचं निश्चित ठिकाण कोणतं?  हे इतरांना कमेंटद्वारे कळवा, जेणेकरुन आपल्या माध्यमातून इतरांचा त्रास कमी होईल.

स्क्रोल डाऊन करुन कमेंट बॉक्समध्ये एटीएमबाबतची माहिती लिहा. तसंच शक्य असल्यास ATM बाहेरील फोटो ट्विटरवर @abpmajhatv ला ट्विट करा किंवा फेसबुकवर www.facebook.com/abpmajha ला मेन्शन करा.