मुंबई: मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईबीसीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ईबीसीची मर्यादा ही 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण त्यासाठी मात्र 60 टक्क्यांची अट घालण्यात आली आहे. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी महाविद्यालयांना 2 वर्षात अधिस्विकृती मिळवणं बंधनकारक केलं आहे.
खासगी कॉलेजमधील किमान 50 टक्के विद्यार्थ्यांची नोकर भरती ही अनिवार्य केली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातल्या मागण्या सकल मराठा मोर्चाच्या निवेदनात आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
सहा लाखांपर्यंत उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना सीईटीला 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने योजना सुरु करण्यात आली आहे. अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी 30 हजार प्रतिवर्ष देण्यात येतील. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये सवलत लागू करण्यात येईल.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना सुरु करण्यात आली. जेवण, राहणे, शिक्षणखर्चासाठी 4 ते 5 हजार रुपये देण्यात येणार आहे.
खासगी शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. याबरोबरच राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला 782 कोटी रुपये देण्यात येतील.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय
- व्यावसायिक शिक्षणात SC,ST ,OBC यांना फी मिळते
- ही योजना सुरु करण्यात आली, यात 6 लाख उत्पन्न असलेल्या सगळ्यांसाठी योजना लागू करण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक शुल्क ओबीसी 50% सवलत त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ही योजना
- सरसकट सर्व विद्यार्थ्यांना 60%गुण आणि 6 लाख उत्पन्न
- अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अट नाही
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घेताना मदत
- मराठा समाज मोर्चा महत्वाची मागणी कि शिक्षण परवडत नाही
- इंजिनिअरिंगसाठी खासगी 1 लाख 45 हजार जागा तर 6 हजार शासकीय जागा
- सामान्य माणसांना खासगी प्रवेश घेणं त्रासदायक आहे.
- या योजनेनंतर 1 लाख 45 जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.
- पंजाबराव देशमुखांच्या नावानं योजना
- अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेताना निवासासाठी 30 हजार रुपये प्रतिवर्ष देण्याचा निर्णय
- पंडित दिनदयाळ उपाधअयाय स्वयम योजना- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना
- आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण, शिक्षणसाहित्य शासनाकडून
- सहा हजार रुपये मोठ्या शहरांमध्ये तसेच, छोट्या शहरांमध्ये ५ आणि ४ हजार रुपये दरमहा देणार
- फी प्रतिपूर्ती योजना आतापर्यंत फक्त खाजगी महाविद्यालयांसाठी होती. आता सरकारी महाविद्यालयांसाठीही फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार
- मेरिट विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये पण सवलत मिळणार
- 2.5 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांनी खासगी मेडिकल कॉलेजसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर व्याज राज्य सरकार भरणार
- 2. 50 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलीही अट नाही. 2. 5 ते 6 लाखसाठी 60%ची अट आहे.
- कॉलेजं दुकानांसारखी चालवू नका. कॉलेजेसनी 50% प्लेसमेंट केली पाहिजे
- कॉलेजेसची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार
- यावर्षीपासून योजना लागू होणार, 1000 कोटींची तरतूद
- राधानगरी धामणी मध्यम प्रकल्पाला 782 कोटी
- मुंबई उच्च न्यायालयाला १० हजार चौरस फूट जागा
- वारणा प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता
मराठा आरक्षण प्रतिज्ञापत्रावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- सरकारने वेळ मागितला नाही, किमान कोर्टाचं खरं दाखव, आम्हाला फाटकारलं नाही. याचिकाकर्त्यांनी वेळ मागितला.
- यापूर्वी भूमिका मांडली आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाही.
- सरकारी कॉलेजमध्ये मराठा समाजाला 900 जागा मिळतील.
- खासगी कॉलेजमध्ये फी भरावी लागते, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे
-आरक्षणाबाबत आमच्यात संभ्रम नाही, तुम्ही करू नका
- मराठा संघटनांशी चर्चा झाली आहे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नाही, दुरुपयोग होतो त्यावर आक्षेप, दुरुपयोग होऊ नये यासाठी चर्चा सुरु आहे.
- जनतेला आवाहन आहे की, काही मूठभर लोक आहेत जी केवळ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी असे प्रयत्न करीत आहेत.
- चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, भडकावणारी वक्तव्य करायची आणि समाजात तेढ निर्माण करायचा हे योग्य नाही.
- सरकार सर्व समाजाचा विचार करत आहे. एका समाजाने दुसऱ्या समाजविरुद्ध भूमिका घेऊ नये
- शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांना अपेक्षित असं वर्तन सगळ्यांकडून करावं असं माझं सगळ्यांना आवाहन आहे.
- पवार मोदींना भेटले पण चर्चा काय झाली कल्पना नाही.
संबंधित बातम्या:
मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारलं नाही : मुख्यमंत्री