मुंबई : रविवारी शिवडीतील जकरीया बंदर परिसरात झालेल्या भीषण अपघात झाला होता. या घटनेत एकुण 6 जण जखमी झाले होते तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आज मुंबईतल्या केईएम रुग्णालयात अपघातातील रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे.


या अपघातातील जखमींवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच आरोपींना पकडण्यात यश न आल्याने जखमींच्या नातेवाईकांचा गोंधळ घातला आहे. जवळपास दीडशेहून अधिक लोकांनी मिळून रुग्णालयात गोंधळ घातला आहे. या सर्व प्रकारामुळे केईएम रुग्णालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास 150-200 च्या जमावाने रुग्णालयाच्या आत शिरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. तर घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनलंय आहे. या सर्व प्रकारामुळे केईएम बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

KEM Hospital | केईएम रुग्णालयात संतप्त नातेवाईकांचा गोंधळ | मुंबई | ABP Majha



काल शिवडीतून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात अर्टिगा कार चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या 6 जणांना भरधाव कारने उडवले. हा अपघात इतका भीषण होता की कार रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानंतर या पुढे उभ्या असलेल्या सहा नागरिकांनाही धडक दिली. या सर्व जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचार करत असतानाच एकाचा मृत्यू झाला आहे.