CIDCO Lottery 2022 : परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत. 


नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 


 






कोरोना महासाथीमुळे म्हाडा, सिडकोकडून घरांसाठी सोडत काढण्यात आली नव्हती. नव्या घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून चाचपणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तर, सिडकोच्या पाच हजार घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया नव्या वर्षात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना महासाथीनंतर ही लॉटरी निघणार असल्यामुळे घर खरेदीच्या प्रतिक्षेत असलेल्यांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha