मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोस्टल रोडच्या कामाची पहाणी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. प्रियदर्शनी, अमरसन्स आणि वरळी या तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कामाची पहाणी केली. यावेळी मुख्ययमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "लॉकडाऊननंतर आता काम पुन्हा सुरळीत सुरु झालंय आणि अपेक्षित वेळेतच ते पूर्ण होईल."


कसं आहे कोस्टल रोडचं काम?


नरिमन पॉईंट ते वरळी सी लिंकपर्यंत आणि वरळी सी लिंकहून बांद्रामार्गे बोरीवली असा कोस्टल रोड असणार आहे. कोस्टल रोडचा मूळ प्रकल्प 3 टप्प्यात विभागला आहे.


पहिला टप्पा :




  • नरिमन पॉईंट ते वरळी (हे काम मुंबई महापालिकेकडे आहे) या पहिल्या टप्प्यात 4 उपटप्प्यांत काम केले जाईल.

  • नरिमन पॉईंट ते गिरगांव चौपाटी - समुद्रालगतचा मार्ग असेल

  • गिरगांव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क मार्ग - भूयारी मार्ग असेल

  • प्रियदर्शनी पार्क ते अमरसन्स - (कट अॅन्ड कव्हर टनेल असेल)

  • अमरसन्स ते वरळी सिंलींक - समुद्रावरुन सी लिंकला जोडणारा रस्ता (एलिव्हेटेड ब्रीज असेल)


दुसरा टप्पा :




  • वरळी - बांद्रा सी लिंक - हा आधीच तयार झाला आहे.


तीसरा टप्पा (प्रस्तावित आहे) :




  • बांद्रा ते बोरिवली

  • कोस्टल रोडच्या भूयारीकरणासाठी देशातील पहिले सर्वात मोठा व्यास असणारे अजस्त्र मशिन वापरले जात आहे.

  • 38 फुटांचा व्यास असणारे हे टनेल बोरिंग मशिन आहे.

  • कोस्टल रोडमध्ये दोन मोठ्या बोगद्यांचे काम करण्यात येणार आहे. हे दोन्ही बोगदे तीन पदरी असणार आहेत. म्हणजेच दोन भुयारांमध्ये मिळून 6 मार्गिका असतील.

  • कोस्टल रोडचं महापालिकेकडे असलेल्या पहिल्या टप्प्याचं काम मे 2023 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

  • या कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी टनेल बोरिंग मशीनचे प्रत्यक्ष काम 15 डिसेंम्बर रोजी केलं जाणार आहे, या मशीनचा व्यास 12.1 मीटर असून म्हणजेच 38 फूट आहे. हे 200 कोटींचे चीननिर्मीत मशिन आहे.

  • देशातील सर्वात मोठा व्यास असलेले हे पहिले मोठे टनेल बोरींग मशिन आहे.

  • कोस्टल रोडचा एकूण प्रकल्प 12800 कोटींचा आहे. यांपैकी आतापर्यंत 1400 कोटी खर्च झालेत.

  • कोस्टल रोडचं 21% फिजीकल काम झालं आहे तर आर्थिक खर्च 17% झाला आहे.


संबंधित बातमी : 

कोस्टल रोडचं काम इको फ्रेंडली विटांनी होणार, इस्रायलच्या कंपनीला कंत्राट 

Coastal Raod | मुंबईतील कोस्टल रोडचं काम नेमकं कसं सुरुये?