मुंबई : राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू यासाठी सरकार सर्वोतोपरी उपोययोजना करत आहेत. गर्दी टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाव् आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.
सीईटीची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, असंही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिलं आहे. येत्या 29 मार्चला सीईटीची परीक्षा होणार होती. आता कोराना व्हायरसच्या संकटामुळे ही परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे. अशीच परिस्थिती उद्भवल्यास परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद
Coronavirus : क्वारंटाईनचा शिक्का असूनही चौघा संशयितांचा रेल्वेतून प्रवास
कोरोनामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाल्याने सिंगापूरमध्ये काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात यायचा मार्गही मोकळा झाला आहे. संध्याकाळच्या विमानाने हे 50 विद्यार्थी मुंबईत दाखल होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पालकांनी विमानतळावर गर्दी न करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सीबीएसई बोर्डाने सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर 31 मार्च नंतर घेण्याचे जाहीर केले आहे.
संबंधित बातम्या
- Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार : अनिल देशमुख
- Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे
- Coronavirus | घाबरुन कोणतंही युद्ध जिंकता येत नाही, महाराष्ट्र नक्की जिंकणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Coronavirus | चीनमध्ये कसा पसरला कोरोना? कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉ. संजीव चौबे 'माझा'वर