नवी मुंबई: चिमुकल्यांना निर्जनस्थळी नेऊन, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृतांना पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. या विकृतांची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.
हे विकृत सोसायटीत,रस्त्यांवर खेळणाऱ्या लहान मुला-मुलींना, त्यांच्या आई- वडिलांनी बोलावल्याचे सांगून, निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात.
सुरुवातीला नवी मुंबई, त्यानंतर मुंबईत आता मात्र ठाण्याकडे या विकृतांनी आपला मोर्चा वळविला आहे.
नवी मुंबईतील खारघर, सीबीडी, सानपाडा, वाशी, एपीएमसी, कोपरखैराणे, रबाळे, दिंडोशी,कांदिवली आणि नुकतीच ठाण्यातील नवघर,डोंबिवली परिसरात लहान मुलींवर या विकृतांकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नवी मुंबई पोलीस अमानवी कृत्य करणाऱ्या विकृतांचा कसून शोध घेत आहेत.विकृतांचा शोध घेण्यासाठी आता नवी मुंबई पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. मात्र हे विकृत पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे, नवी मुंबई पोलीस हतबल झाले आहेत.
हे विकृत सतत वेश बदलत असतात.त्या मुळे विकृतांची माहिती देणाऱ्यास नवी मुंबई पोलिसांकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. विकृतांची माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे.
या विकृतांचा फोटो नीट पाहा, पोलिसांना कळवा, 25 हजार मिळवा!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
26 Sep 2017 08:25 AM (IST)
हे विकृत सोसायटीत,रस्त्यांवर खेळणाऱ्या लहान मुला-मुलींना, त्यांच्या आई- वडिलांनी बोलावल्याचे सांगून, निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -