मुंबई : मुंबईत मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या धावपटूंना चोरीचा फटका बसला. पवईत पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईलसारख्या महागड्या वस्तू चोरण्यात आल्या.

धावपटूंनी आपल्या गाड्या पवई आयआयटी परिसरात पार्क केल्या होत्या. मात्र चोरट्यांनी गाड्यांच्या काचा फोडून आतील महागड्या वस्तू लंपास केल्या.

पवई पोलिस ठाण्यात 12 गाड्या फोडल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. अनेकांचे लॅपटॉप, मोबाईल फोन, बॅग आणि त्यातील रोकड अशा मौल्यवान वस्तू गायब झाल्याची तक्रार आहे.

मुंबईतील पवई आयआयटीमध्ये हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून, राज्यभरातून अनेक धावपटू मुंबईत आले होते.