मुंबई : दैनंदिन आयुष्यातील दगदगीच्या काळात लोकांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच लोकांची गरज ओळखून त्यांना उपचारपद्धतींची पूर्तता करण्यासाठी सॅण्डो टेक्निकल ऑपरेशन्स या नोवार्टिसच्या विभागाने मुंबईतील कळवे येथे आज औषध आणि उपचारपद्धतींच्या उत्पादनाचा कारखाना सुरू करण्यात आला. या कारखान्यामुळे जागतिक स्तरावरील आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करण्यास सहाय्य केले जाणार आहे. तसेच भारतातील काम अधिक भक्कम होणार आहे. हा नवीन कारखाना जागतिक बाजारपेठेसाठी मुख कर्करोगावरील औषधांचे उत्पादन करणार आहे आणि कॅन्सरवर उच्च दर्जाचे उपचार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 


32000 चौरस मीटर भागात उभारला कारखाना 


हा कारखाना साधारण 32000 चौरस मीटर भागात पसरलेला आहे. हा कारखाना निर्यात बाजारपेठांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आला आहे. कारखान्यात सध्या 70 कर्मचारी आहेत. याशिवाय, ब्राउनफील्डवर बांधण्यात आलेल्या या कारखान्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी युनिट्स स्थापन करण्यात आले आहेत, त्यामुळे या कारखान्यात अत्याधुनिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत असे उत्पादन वातावरण निर्माण करण्यात आले आहे. 


नोवार्टिस इंडियाचे कंट्री प्रेसिडेंट संजय मुर्डेश्वर या कारखान्याच्या उद्घाटनाबद्दल म्हणाले, “सॅण्डोजमध्ये आज आमच्यासाठी एक महत्त्वाचा पल्ला गाठला गेला आहे. भारतातील कळवे येथे नवीन उत्पादन कारखान्याचे उद्घाटन आणि आँकोलॉजी ओरल सॉलिड्सच्या निर्मिती स्थळाचे उद्घाटन म्हणजे जेनेरिक मुख कर्करोग घटकांच्या जगभरातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आमचे आघाडीचे स्थान आणखी भक्कम झाले आहे. शिवाय, हा कारखाना सुरू केल्यामुळे, जगभरातील रुग्णांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उद्दिष्टाला सहाय्य करण्याप्रती असलेली आमची बांधिलकीही अधिक सखोल झाली आहे.”


महत्वाच्या बातम्या :