Cuff Parade Bus Accident:  मुंबईतील कफ परेड (Cuff Parade) भागात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 54 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीचं नाव बाळाराम बागवे असं असून ते एका बँकेत कर्मचारी होते. या अपघातात बेस्टच्या बसचा (BEST Bus) चालक देखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या अपघातामध्ये दुचाकी वाहनांचे देखील नुकसान झाले असून कफ परेड पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमकं काय घडलं?


मुंबईतील कफ परेड भागात हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेस्ट बसला जाऊन धडकली. या बसच्या पुढे एक व्यक्ती चालत होता. मागून येऊन या बसने त्याला धडक दिल्याने दोन्ही बसमध्ये चेंगरुन या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच या घटनेमध्ये बसचा चालक देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 





बस चालकावर गुन्हा दाखल


या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे चालकावर  निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कफ परेड पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये अनेक दुचाकी वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. या दोन्ही बसमध्ये इतकी जोरात धडक झाली की रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेस्टची बस सुमारे 120 फूट पुढे सरकली. या बस अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा अपघात सकाळच्या वेळेस झाला त्यामुळे रस्त्यावर रहदारीचे प्रमाण कमी होते. तसेच या संदर्भात पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


व्हिडीओ: Mumbai Bus Accident : कफ परेड येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू, घटनेचं सीसीटीव्ही समोर


 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


BMC Water Price:  मुंबईकरांचं पाणी महागणार; 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता