India Weather Forecast : जून महिना सुरु झाला की, सर्वजण पावसाची आतुरतेनं वाट पाहू लागतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या सोमवार, 5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. महाराष्ट्रात 10 जूनला (Maharashtra Monsoon Update) मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उन्हाच्या झळांपासून कधी सुटका मिळणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मान्सून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचला आहे. 


उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होणार


दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीनं सुरु आहे. मान्सून 5 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. गेल्या दोन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यासोबत मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. त्यामुळे मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


पाहा व्हिडीओ : मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर, 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता



बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी


राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास उशीर होणार? हवामान खात्याचा अंदाज काय?