BMC tweet photo : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असं बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या एका फोटोवरून नेटकरी भडकले आहेत. मुंबई महापालिकेच्या 'एल' प्रभागाने एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोवरून महापालिकेच्या असंवेदनशीनलतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
असं काय आहे त्या फोटोत?
मुंबई महापालिकेच्या ट्वीटर हॅण्डलवरून नागरिकांना माहिती, महत्त्वाची सूचना केली जाते. अनेक नागरीक त्यांच्या विभागातील समस्या मुंबई महापालिकेच्या मुख्य हॅण्डलवर अथवा संबंधित प्रभागाच्या हॅण्डलला टॅग करून मांडत असतात. एक युजर्सने आपल्या विभागातील सांडपाणी वाहून नेणारे गटार तुंबले असल्याची तक्रार केली. गटार तुंबल्यामुळे शौचालयातील पाणी बाहेर येत असल्याचे युजरने म्हटले.
या युजरच्या तक्रारीवर कारवाई केली असल्याचे महापालिकेच्या 'एल' प्रभागाने कळवले. गटार स्वच्छ केले जात असल्याचे सांगताना महापालिकेने एक फोटोही ट्वीट केला आहे. या फोटोत एक सफाई कामगार हाताने गटारातील मैला साफ करत असल्याचे दिसत आहे. नेमक्या याच फोटोवरून नेटकरी भडकले आहेत. गटार स्वच्छ करणाऱ्या कामगाराने ग्लोव्हजचादेखील वापर केला नाही. गटारात हात टाकून सफाई सुरू असल्याचे फोटोत दिसत आहे.
सोशल मीडियावर संताप
हाताने मैला वाहणे याला कायद्याने बंदी असल्याची आठवण नेटकऱ्यांनी महापालिकेला करून दिली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक उपकरणे देता येत नाही का? मैला स्वच्छ करण्याचे कामासाठी यंत्राचा वापर करता येत नाही असा सवालही नेटकऱ्यांनी केला. महापालिकेने हा फोटो सोशल मीडियावर ट्वीट करून असंवेदनशीलता दाखवली असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron Virus : ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही
Bhopal Gas Tragedy : भोपाळमधील 'ती' काळरात्र! 37 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेमागची कारणं...
घशात च्युईंगम अडकलं अन् शाळकरी मुलाचा जीव गेला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha