मुंबई : राज्यात पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध एनसीपी (NCB vs NCP) असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील 5 महत्त्वाच्या केसेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amir Shah) यांच्या आदेशानुसार एनसीबी आपल्या ताब्यात घेणार आहेत. तसं पत्र एनसीबीच्या महासंचालकांनी यांनी राज्याच्या महासंचालकांना लिहिले आहे. यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशाने 'आपण तात्काळ नमूद केलेल्या 5 केसेस एनसीबीकडे वर्ग कराव्यात' असं लिहिण्यात आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली देत केंद्रावर निशाणा साधला आहे.

 

संबधित सर्व प्रकरणावर बोलताना नवाब मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. एनसीबीच्या महासंचालकांनी एक पत्र 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महासंचालकांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की, अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटीनार्कोटिक्स सेलने ज्या 5 महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात. एनसीबीच्या महासंचालकांच्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह यांना सवाल विचारताना मलिक म्हणाले, 'त्यांनी एनसीबीला दिलेल्या आदेशात ज्या पाच केसेस नमूद केल्या आहेत. त्या केसेसचे निकष काय आहेत. एनसीबीने कारवाई केलेल्या छोट्या केसेस की राज्याच्या युनिटने हस्तगत केलेल्या 3 टन ड्रग्जसारख्या मोठ्या केसेस आहेत, हे असं बोलत मलिकांनी एनसीबीसह केंद्र सरकारला टोला दिला आहे. एनसीबीपेक्षा अधिक काम राज्याच्या अँन्टी नार्कोटिक्स विभागाने केलं आहे. संबधित पाच केसेसच्या माध्यमातून एनसीबीचा पैसे उकळण्याचा धंदा सुरु आहे, असाही आरोप मलिकांनी केला आहे.

 

केंद्राने उत्तर द्यावं

 

मलिकांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'एनसीबी खरंच काम करत असेल तर जी 26 बोगस केसेसची प्रकरणे तुम्हाला पाठवली आहेत याची चौकशी करा. हे आता स्पष्ट झालं आहे की, महाराष्ट्रातील एनसीबीच्या युनिटच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. त्यांनी आपली प्रायव्हेट आर्मी देखील सुरु केली आहे. त्यामुळे या केसेस त्यांच्याकडे कशाला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावं.'

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha