मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची मुंबई महापालिका चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेच्या चुकीमुळे अपघात झाला की हा घातपात आहे, हे लवकरच समोर येईल.


मुंबईत शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यावेळी घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शीतल भानुशाली नावाची 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना समोर आली. आज पहाटे 3 वाजता संबंधित महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला.


घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला


पण असल्फा ते हाजीअली हे अंतर जवळपास 20 ते 22 किमी आहे. मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या अंतरावर जाणं शक्य नसल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. शिवाय, महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या, ग्रील्स लावले आहेत. असल्फाच्या पुढे साकीनाका इथेही लावलेल्या ग्रील्सच्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते. त्यामुळे तब्बल 20 ते 20 किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


त्यामुळेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी उपायुक्तांना या प्रकरणी चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतात का हे पाहिले जात आहे. शिवाय पोलीसही तपास करत आहेत.


संबंधित बातम्या


जीवाची पर्वा न करता भर पावसात, तुंबलेल्या पाण्यात 'ती' तब्बल सात तास उघड्या मॅनहोलजवळ उभी राहिली!


मॅनहोलमध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईचं काय? हायकोर्टाचा सरकारला सवाल


मुंबईतील उघड्या गटारीत पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबवला, महापालिकेची माहिती


बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह सापडला


घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला