धोकादायक इमारतींबाबत निर्देश
अति धोकादायक 398 इमारतींपैकी एन विभागात (घाटकोपर) – 64, के/पश्चिम (अंधेरी आणि जोगेश्वरी पश्चिम) – 51 आणि टी विभागात (मुलुंड) – 47 इमारती असून यापैकी 193 इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तर 46 इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. 159 इमारतींची वीज आणि पाण्याची जोडणी तोडण्याचे निर्देश देण्यात आले.
नालेसफाई
254.64 किमी लांबीच्या मोठ्या नाल्यांमधून एकूण 3,49,050 टन गाळ काढायचा आहे. त्यातील पावसाळ्यापूर्वी 70 टक्के गाळ काढायचा असून 14 मे 2019 पर्यंत 2,44,335 टन गाळ काढून आणि वाहून नेण्यात आला आहे. तर एकूण 443.850 किमी लांबीच्या छोट्या नाल्यांमधून एकूण 3,09,777 टनापैकी 2,16,843 टन गाळ काढून आणि वाहून नेण्यात आला असून 31 मे 2019 पर्यंत 100 टक्के नालेसफाई करण्याचे निर्देश दिले.
चौपाट्यांवर व्यवस्था
बृहन्मुंबईतील सर्व चौपाट्यांवर मिळून 93 जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. बीच सेफ्टीसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीसाठी गोवालिया अग्निशमन केंद्र, दादर चौपाटीसाठी शिवाजी पार्क अग्निशमन केंद्र, जुहू चौपाटीसाठी गोरेगाव अग्निशमन केंद्र, वर्सोवा चौपाटीसाठी चिंचोली अग्निशमन केंद्र, अक्सा चौपाटीसाठी मालाड अग्निशमन केंद्र आणि गोराई चौपाटीसाठी दहिसर अग्निशमन केंद्र येथे पॉवरबोट, जेट स्की आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ येत्या आठवडाभरात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
पूरस्थितीत तात्पुरती निवासस्थाने
संभाव्य दुर्घटना अथवा पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागल्यास महापालिकेच्या शाळा ‘तात्पुरती निवासस्थाने’ सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.