मुंबई: मुंबई महापालिकेचा 2017-18साठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 12 हजार कोटीची घट करण्यात आली आहे. यंदा 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तब्बल 12 हजार कोटींची घट झाली आहे.

या अर्थसंकल्पात बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात महापालिका बेस्टला काय देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण कोणतीही भरीव तरतूद करण्यात न आल्यानं बेस्टचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अंदाजित खर्च 12 हजार कोटी आहे. तसंच गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.

दुसरीकडे रस्ते कामांमध्येही यंदा बरीच काटकसर करण्यात आली आहे. रस्ते पुर्नबांधणीसाठी 1,095 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी 2886 कोटी एवढी तरतूद होती.

तर यंदा नाले सफाईसाठी ७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी नाले सफाई आणि रस्ते घोटाळ्यांवरुन विरोधकांनी शिवसेनेला टार्गेट करत अक्षरश: रान उठवलं होतं.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

-मुंबई महापालिकेचा २१७-१८ साठीचा अर्थसंकल्प जाहीर

-आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला

-दरवर्षी अर्थसंकल्पाचा फुगणारा आकडा रोखला, तब्बल १२ हजार कोटींची घट

-बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही

-कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद, संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित रक्कम १२ हजार कोटी

-गोरेगांव मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद

-तोट्यात असलेल्या बेस्ट साठी कोणतीही भरीव तरतूद नाही, आर्थिक सहाय्य निश्चित कार्यक्रम आणि कार्यक्षमतेच्या आलेखावर अवलंबून

-रस्ते कामातही यंदाच्या बजेटमध्ये काटकसर

-रस्ते दुरुस्ती आणि पुर्नबांधणीसाठी १,०९५ कोटींची तरतूद, गेल्यावर्षी २८८६ कोटी इतकी तरतूद केली होती

-मुंबईतला पार्कींग प्रश्न सोडवण्सासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार

-९२वरुन ही संख्या २७५करणार, तसंच तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी १ कोटींची तरतूद

-माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत महापालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत माहिती प्रणाली उभारणार

- मेडिकल हिस्ट्री, प्राथमिक रिपोर्टस्,  रुग्णांची नोंदणी, इ. माहितीसाठी सॉफ्टवेअर

- माहुल आणि गजदरबांध पंपिंग स्टेशनसाठी ६५ कोटींची तरतूद

- शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणार

- नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद

- मिठी नदीच्या किना-यावरील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे, सुशोभिकरण करणे यासाठी २५ कोटींची तरतूद

- कॅशलेस व्यवहार आणि एम गव्हर्नन्ससाठी महापालिकेच्या ११५ सेवा

- एम- गव्हर्नन्स ( मोबाईल द्वारे नागरी सुविधा) अंतर्गत आणणार, कॅशलेस व्यवहारास उत्तेजन देण्यासाठी

- शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणार

- उघड्या नाल्यांचे आच्छादीकरणासाठी नाल्यांवर अँक्रेलिक पत्रे टाकणार, मुलुंड, कांदिवली येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवणार, तरतूद ९ कोटी

- पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ४७५ कोटींची तरतूद

-  महापालिका रुग्णालयात ९ नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स सुरु केले जातील

- प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया संसर्गरहित होण्यासाठी हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर गरजेचे, यासाठी २१.५० कोटींची तरतूद

- महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या ४००पेक्षा जास्त वाढवण्यासाठी ३० कोटींची तरतूद

- महापालिकेच्या २८ प्रसुतीगृहांचा दर्जा वाढवण्यासाठी, आधुनिकीकरणासाठी ८.९० कोटींची तरतूदॉ

-नवे उपक्रम--आपली चिकीत्सा-- महापालिकेच्या दवाखान्यातून नि:शुल्क निदान सेवा उपलब्ध करुन देणार, १६.१५ कोटींची तरतूद
-गोरेगाव पूर्वमध्ये मल्टीस्पेशॅलिटी क्लिनीक सुरु करणार, १० लाखांची तरतूद

- हगणदारीमुक्त मुंबईसाठी  तरतूद, सामुदायिक शौचालये ७६ कोटी, घरगुती शौचालये ५.७० कोटी, सार्वजनिक शौचालये २.८८ कोटी
सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज, पाणी पुरवठ्यासाठी २६.३७ कोटीची तरतूद. मात्र, महिला शौचालयांसाठी भरीव तरतूद नाहीच. मुंबईभरात येत्या वर्षांत महिलांसाठी  केवळ ८ नवी शौचालये
- राईट टू पी साठी महापालिकोची भरीव तरतूद नाही
- मुंबई शहराच्या साफसफाईसाठी खास यांत्रिक झाडू आणणार, २० कोटींची तरतूद

- सामूहिक शौचालयांध्ये १०० नवीन सँनिटरी नँपकीन व्हेंडींग मशिन आणि इन्सनरेटर स्थापित करणार. यासाठी १ कोटींची तरतूद

- डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रियेसाठी, कच-यापासून वीजनिर्मीतीसाठी १५० कोटींची तरतूद

- येत्या वर्षात मुंबईत ८४ मैदानांचा विकास केला जाणार २६.८० कोटींची तरतूद

- मुंबईतल्या २० उद्याने/मनोरंजन मैदानांच्या विकासाठी ७० कोटींची तरतूद
- ८ ठिकाणी नवे जलतरण तलाव, कांदिवलीत ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव यासाठी ४५ कोटींची तरतूद

-वांद्रे किल्ला क्षेत्रासाठी १ कोटींची तरतूद
- वांद्रे तलावाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटींची तरतूद

                       
- उद्यान खात्यासाठी पुढील वर्षात २९१.८० कोटींची तरतूद

-राणी बागेच्या विकासासाठी ५०.२५ कोटींची तरतूद