मुंबई: मुंबई महापालिकेचा 2017-18 चा शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना अतिरीक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर केला.


शिक्षण समितीसाठी यंदा 2311.66  कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या शिक्षण समिती अर्थसंकल्पात 83 कोटींची घट झाली आहे. 

बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे 

  • डिजीटल स्कूल अंतर्गत 1200 महापालिकेच्या शाळा डिजीटल होणार आहेत. यासाठी बजेट मध्ये दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • बंद झालेल्या शाळांचं एकत्रीकरण करुन बंद झालेल्या शाळा आदर्श शाळांच्या धर्तीवर उभारणी करणार.

  • शिक्षण विभागाकडून मुंबई विभागात अद्ययावत सभागृह निर्माण करणार

  •  ९ वी -१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कार्यक्रम. 



  • शालेय विद्यार्थीनींसाठी  सॅनिटरी- नॅपकीन वेंडिंग/ बर्निंग मशिनची उभारणी

  • बीएमसीच्या १२० प्राथमिक , ५५ माध्यमिक शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर

  •  टॅब योजना गेल्या वर्षीप्रमाणेच चालू 

  • खाजगी शाळातील "सिस्टर स्कूल"-- पूर्व उपनगरांतील ३२ महापालिका शाळांमध्ये खाजगी शाळेतील शिक्षकांना घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार

  • टॅबसाठी तरतूद-- 2017-18 साठी 7.83 कोटींची तरतूद

  • व्हर्च्युअल क्लासरुमसाठी 19 कोटींची तरतूद

  • टॅबसाठी 7.83 कोटींची तरतूद

  • महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश- 31 कोटी

  • 27 शालेय शिक्षण वस्तुंसाठी 98 कोटी

  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास योजना

  • विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी खास उपस्थिती भत्ता

  • दिव्यांग विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता-; 1.16 कोटी

  • दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 10 तसंच प्रतिपालक 10 असा एकूण 20 रुपये प्रतिदीन उपस्थिती भत्ता मिळणार.

  • एकूण 4094 दिव्यांग विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार.

  • तसंच, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी- 40.94 लाख

  • बालवाडी वर्गातील मुलांसाठी खास टॉय लायब्ररी-- 1.76 कोटी

  • मोफत क्रीडा गणवेश -- ३१ कोटी

  • क्रीडा प्रशिक्षक-- २१ कोच, ७ प्रशिक्षीत क्रीडा प्रशिक्षक--३८.६२ लाख

  • महापालिका शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा मिळवून देण्यासाठी खास प्रयत्न/योजना--

  • विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षांचे आयोजन

  • महापालिकेच्या २६ शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवणार. त्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक बाबी उपलब्ध करुन देणार- १ कोटीची तरतूद

  • शिक्षण विभागाच्या कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या मालकीचे अद्ययावत सभागृह-- ५० लाख तरतुद


 

शिवसेनेच्या वचननाम्यातील शैक्षणिक घोषणांचा शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात विसर

शिवसेनेच्या वचननाम्यात असलेले मात्र अर्थसंकल्पात गायब असलेले मुद्दे---

  • ई वाचनालये

  • कौशल्य विकास, व्यवसायभिमुख शिक्षणाला चालना देणारी विकासकेंद्रे

  • विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर्स

  • संगीत अकादमी सुरु करण्याची भरीव तरतूद

  • दर्जेदार माध्यान्ह भोजनासाठी भरीव तरतूद