मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी 2569 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 2311 कोटी रुपये होती. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 25 हजार 141 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
  • कोस्टल रोडसाठी 1500 कोटींची  तरतूद
  • विद्यमान करांमध्ये कोणतीही वाढ नाही, नवे कर प्रस्तावित नाहीत.
  • गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्प – 100 कोटी रुपयांची तरतूद
  • रस्ते कामासाठी – 1202 कोटी
रस्ते कामात नेमकं काय-काय होणार?
  • सात रस्ता येथील संगमस्थानावरील सुशोभीकरण
  • पावसाळ्यातील खड्डे बुजवून तात्काळ दिलासा मिळण्याकरता महापालिकेद्वारे खास प्लँटची उभारणी करण्यात येणार
  • ब्लँक स्पॉट्सची निश्चिती करुन ब्लँक स्पॉट आणि हटवण्याचं काम करण्यात येणार
  • नद्या आणि नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबण्याच्या परिस्थितीला अटकाव करण्यासाठी दहिसर, पोयसर, ओशिवरा, मिठी या नद्यांच्या पातमुखांवर फ्लोटिंग ट्रॅश बूम्स बसवण्याचा प्रस्ताव
  • हिंदमाता या पूरप्रवण क्षेत्रासाठी खास 1800 मिमी व्यासाच्या परिजन्य जलवाहिन्यांचे बांधकाम मायक्रोटनेलिंग पद्धतीने होणार
  • मुंबईत पावसाळ्या निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी 53.71 कोटींची तरतूद
  • मॅनहोलमध्ये पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मॅनहोलमध्ये 1450 जाळ्या बसवणार, 1.22 कोटींची तरतूद
  • मुंबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता 25 लाखांची तरतूद
  • सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी - 50.70 कोटी
  • उद्यान खात्यांसाठी – 243 कोटींची तरतूद
  • देवनार डंपिंग ग्राऊंड इथे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 110 कोटी
  • मुलुंड डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 65 कोटी
  • उद्यान विभागासाठी 243 कोटी
  • तानसा पाईपलाईन शेजारील सायकल ट्रॅकसाठी 100 कोटी
  • मलनिःसारण सुधारणांसाठी 119 कोटी
  • रस्त्यांसाठी 2058 कोटींची तरतूद असून त्यातील सिमेंट रस्त्यांसाठी 434 कोटी तर डांबरी रस्त्यांसाठी 590 कोटी
  •  महापालिकेच्या मंड्यांमध्ये ऑर्गेनिक कन्व्हर्टरची उभारणी करण्यात येईल, 12 कोटींची तरतूद
  • ओसी नसलेल्या पुनर्वसित इमारतींना जलजोडणी दिली जाणार
बेस्टसाठी ठोस आर्थिक तरतूद नाहीच या बजेटमध्येही तोट्यातील बेस्टसाठी ठोस आर्थिक तरतूद नाहीच. उपाययोजना राबवल्यावरच भांडवली खर्चासाठी मदत देणार
  • नवीन विकास आराखडा अंमलबजावणीसाठी 2665 कोटींची तरतूद
  • नवीन पूल बांधणीसाठी 467 कोटी
  • 55 ठिकाणची पूर प्रवण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 53.71 कोटींची तरतूद
  • मिठी नदी सुधारणेसाठी 15 कोटी
  • प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगाचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आणि विशेष दवाखाने सुरु करणार, 1 कोटींची तरतूद
  • भटके श्वान, मांजरं, पाळीव प्राणी यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत प्रथमच शव दाहिनीची सुविधा
  • आपत्कालिन व्यवस्थापन – 11.69 कोटी
मुंबई महापालिका शिक्षण समिती अर्थसंकल्प महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास योजना (झिरो तिकीट) योजना. प्राथमिकसाठी 50 कोटी, माध्यमिकसाठी – 15 कोटी टॅब वाटपसाठी तरतूद प्राथमिकसाठी - 6 कोटी माध्यमिकसाठी – 12 कोटी 649 द्विभाषीक शाळा प्रस्तावित पहिलीपासून इंग्रजी विषय आणि इंग्रजी माध्यमातून गणित विषय असणाऱ्या द्विभाषीक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. 2018-19 आणि पुढील काही वर्षांमध्ये 649 द्विभाषीक शाळा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधरावे यासाठी नवा अक्षरशिल्प प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत आहे. यात सुलेखन वही, चार रेघी वह्या देण्यात येतील. शाळांचं खाजगीकरण पटसंख्या वाढवण्यासाठी बंद पडलेल्या शाळांवर उपाय योजण्यासाठी 35 शाळा खाजगी लोकसहभागाने सुरु होतील. महापालिकेने खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु केली आहे. पूरक पोषण आहार माध्यान्ह पोषण आहारासोबत पूरक पोषण आहार, सुकामेवा देणार प्राथमिकसाठी – 25 कोटी रुपयांची तरतूद माध्यमिकसाठी – 2.38 कोटी रुपयांची तरतूद आंतरराष्ट्रीय शाळा- 24 विभागांमध्ये 24 आंतरराष्ट्रीय शाळा सुरु करणार प्राथमिकसाठी तरतूद – 25 लाख रुपये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग आणि बर्निंग मशिन - 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थिनींसाठी 681 नवीन सॅनिटरी वेंडिंग मशिनची खरेदी 9 वी आणि 10 वीसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोझेबल पाऊचची खरेदी यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद फुटबॉल प्रशिक्षण - रोड टू जर्मनी कार्यक्रमाद्वारे थेट जर्मनीत प्रशिक्षणाची संधी देणार सीसीटीव्ही - 381 शालेय इमारतींमध्ये सुरक्षेसाठी एकूण 4 हजार 64 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद डिजिटल क्लासरुम - महापालिकेच्या एकूण 1300 वर्गांमध्ये डिजिटल क्लासरुम उभारण्यात येणार. डिजिटल वर्गात एक एलईडी, प्रोजेक्टर, कंप्युटिंग डिव्हाईस, एक स्पिकर, व्हाईट बोर्ड बसवला जाणार. यासाठी प्राथमिकसाठी 31 कोटी, तर माध्यमिकसाठी 5.88 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्व शाळांत ध्वनिक्षेपक यंत्रणा - आणीबाणीच्या काळात आणि इतर वेळीही शाळेतील सर्वांनाच सूचना देणे सोयीचे होण्यासाठी सर्व शाळांमध्ये ध्वनिक्षेपक बसवण्यात येणार आहेत. तरतूद-  प्राथमिक – 11.58 कोटी माध्यमिक – 63.25 कोटी कम्प्युटर लॅब - 2882 संगणकांची खरेदी करण्यात येणार आहे. प्राथमिकसाठी 6 कोटी, तर माध्यमिकसाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. SAP कार्यप्रणालीद्वारे शाळेतील कर्मचारी आणि मुख्यध्यापक यांची कार्यपद्धती गतीमान करणार