BJP MLA Ravindra Chavan on Aaditya Thackeray : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचं 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा कल्याण डोंबिवलीमधील एका कार्यक्रमात बोलताना दिला होता. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या त्या सूचक विधानावर भाजपनं (BJP) टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर मानसिक परीणाम झाल्याची टीका भाजप आमदार रवींद्र चव्हाणांनी केली आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा दिला होता. त्यावर टीका करताना भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे. 


कल्याण डोंबिवलीमधील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते  पार पडलं. एमआयडीसी येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी राज्यात आपल्या सरकारच्या काळात विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणनं शक्य झालं, दिल्लीतून देखील विकासासाठी निधी आला पाहिजे, असं बोलताना 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणं शक्य होईल, असं सूचक वक्तव्य करत शिवसेनेचं 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा दिला होता. 


पाहा व्हिडीओ : दिल्लीतून 2024 नंतर मोठा फंड आणता येईल, आदित्य ठाकरे यांचे सूचक विधान



आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजपनं सडकून टीका केली. या भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीत पर्यटनासाठी आले होते, त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला पाहिजे होता. मात्र हल्ली त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायला लागली आहे. 2024 ला पुन्हा सत्तेत येणार त्यांचा हा जो म्हणण्याचा अर्थ होता, तो त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, असं मला वाटतं; असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 


आदित्य ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यात भाजपच्या पाच माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं आपल्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला मोठा धक्का दिला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यात पाच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कल्याण येथील खाडी किनारा सुशोभीकरण आणि नौदल संग्रहालयाच्या कामाचं भूमीपूजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी नितीन पाटील, रंजना पाटील, रणजीत जोशी आणि वृषाली पाटील या भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी तर काँग्रेसच्या रवी पाटील या माजी नगरसेवकानं शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या दोन महिन्यांमध्ये भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळं भाजपला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा धक्का बसला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha