Kirit Somaiya on Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्यापूर्वीच आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आणखी आरोप केले आहेत. "उद्या पत्रकार परिषद घेणार आहात, तर आजच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत, विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय," असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.  


सोमवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणांविरोधात दंड थोपटले आहेत. सर्वांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या आव्हानानंतर आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.  


किरीट सोमय्या म्हणाले, कोविड सेंटरमध्ये झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यावर संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप उत्तरे दिली नाहीत. कोरोना काळात सरकारने जनतेच्या जिवाशी खेळ केला आहे. कोविड कंपनीत घोटाळा करून लोकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. कोविड सेंटरमधील घोटाळ्याचा विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय, असा निशाणा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यार साधला आहे. 


 "संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या पार्ट्या कोणत्या-कोणत्या हॉटेलमध्ये केल्या जातात याची माहिती त्यांनी द्यावी, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी यावेळी केले आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवरही यावेळी आरोप केले. राज्य सरकारकडून फौजदारी कायद्यात घोटाळा करण्यात आला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, फौजदारी कायद्यात राज्य सरकारकडून घोटाळा करण्यात आलाय. मी गुन्हा केला असेल तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. 


उद्या शिवसेना भवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. तेथे पक्षातील पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे संजय राऊत उद्या नेमका कोणता बॉम्ब फोडणार? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे. 


महत्वाच्या बातम्या