BJP MLA Ashish Shelar on Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानवर संजय राऊत पोहचलेत अशी शेलकी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ याच असे आव्हानही शेलार यांनी संजय राऊत यांना दिले. येत्या काही दिवसात शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय कलगीतुरा आणखी रंगण्याची चिन्हं आहेत. 


शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी कारवाईच्या मुद्यावरून भाजपवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती.  आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्त्युतर दिले. संजय राऊत हे एकाकी पडले असून त्यांना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याची साथ नसल्याचेही शेलार यांनी म्हटले. ईडीकडून चौकशीचा ससेमिरा  सुरू आहे त्यामुळे संजय राऊत यांचा थयथयाट सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले. संजय राऊत मागील सात वर्षांपासून भाजपला बदनाम करत आहे. पण सात वर्षे ईडी मागे का लागली नव्हती असाही मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. 


शिवसेनेत राऊत एकाकी 


संजय राऊत आज एकाकी पडले आहेत. त्यांच्या बाजूने शिवसेनेचा एक नेता सुद्धा बोलायला तयार नाही. ज्यांच्या मांडीवर राऊत जाऊन बसलेत. त्या राष्ट्रवादीकडून सुद्धा राऊत यांना साथ दिली नाही. मला राऊत यांची चिंता वाटायला लागली असल्याचे शेलार यांनी म्हटले. 


महापालिका निवडणूक वेळेत व्हाव्यात 


लोकशाही मध्ये निवडुक वेळेत व्हायला हवी असे आशिष शेलार यांनी म्हटले.  सत्तेमध्ये तुम्ही बसलात जे आश्वसन दिले ते 5 वर्षात पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, मुख्यमंत्र्यांच्या जागेची निवडणूक झालीच पाहिजे, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाची मागजी होती. मग मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेत का नाही ? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला.  कोरोनाच्या काळात 2 पोटनिवडणुका झाल्यात. त्याचा प्रचारदेखील झाला. आता महापालिका निवडणुकांबाबत शंका निर्माण होत असल्याचे शेलार यांनी म्हटले. महापालिकेवर प्रशासक बसविण्यामागे कुठला छुपा डाव तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.