Mumbai budget 2022 : मुंबई महानरपालिकेचा अर्थसंल्प नुकताच सादर झाला. परंतु, आता या अर्थसंकल्पावर भापने टीका केली आहे. 'मुंबईकरांवर कोणतीही कर वाढ नाही असं सांगितल जात होतं. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आयुक्तांनी 15 टक्के प्रॉपर्टी टॅक्स वाढवल्याचं सांगितलं. मुंबईकरांवर लावण्यात आलेला कर आम्ही सहन करणार नाही. मुंबईच्या जनतेसोबत आयुक्तांनी विश्वासघात केला आहे, असा आरोप भाजपने केला आहे.
मुंबई महानगरपालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि आमदार राजहंस सिंह यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अर्थसंकल्पावर टीका केली. "मुंबईकरांवर लावण्यात आलेला कर आम्ही सहन करणार नाही. भाजप याचा कडाडून विरोध करेल असा इशारा आमदार राजहंस सिंह यांनी दिला.
"अर्थसंकल्पात मालमत्ता कराचा उल्लेख नाही. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते. बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना ही जुनीच योजना असून त्याचं आता नामकरण केलं आहे. कोविडच्या नावावर सत्ताधाऱ्यांनी गरिबांची लुट केली आहे, असा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.
पभाकर शिंदे म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प फसवा आणि अर्थहीन आहे. मुंबईकरांची दिशाभूल करणारा आणि विश्वासघात करणारा हा अर्थसंकल्प आहे. आयुक्तांनी 15 टक्के मालमत्ता कर वाढवणार असे सांगितले आहे. परंतु, स्थायी समितीमध्ये आयुक्तांनी याबाबत सूतोवाच केले नाही. आयुक्त आणि सत्ताधारी यांनी मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही मालमत्ताकर सहन करणार नाही. शिवसेना जुन्याच योजना पुन्हा आणत आहेत. ही आश्वासनांची खैरात असून उदघाटन करून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार आहे? असा प्रश्न शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- यंदाचा अर्थसंकल्प व्यवस्थेला उभारी देणारा, मात्र न्यायव्यवस्थेला 'नवसंजीवनी' कधी मिळणार? उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
- अमृता फडणवीस म्हणतात, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट; महापौरांनी प्रत्युत्तरात म्हटले...
- मुंबईत काँग्रेसची स्वबळाची समीकरणं फिरणार? काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक!