Traffic jam caused Divorce says Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केला. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. हा नवीन जावईशोध लावला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना घटस्फोटाशी संबंध जोडला. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. एक सामान्य नागरीक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या दाव्यावर टीका केली. मागील काही महिन्यांपासून 'ऐकावे ते नवल', अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपच्या संबंधित लोकांमुळे होत असलेल्या वक्तव्यामुळे लोकांचे करमणूक होते. मात्र, आता लोकंही त्यांच्या अशा वक्तव्याला कंटाळले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. मुंबईला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुंबईतील खड्ड्यांचे काय?
मुंबईतील रस्ते गुळगुळीत आहेत, असा दावा आम्ही कधीही केला नाही. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची माहिती मिळताच ते खड्डे बुजवले जात असल्याचे महापौरांनी म्हटले. वाहतूक कोंडीमुळे लोकांचे घटस्फोट होत आहेत, हे विधान चुकीचं असल्याचे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- भाजप आणि आरएसएस हे पुरोगामी आणि स्त्रियांचा सन्मान करणारे: अमृता फडणवीस
- नाशिकच्या महिलेचा कर्नाटक पोलिसांना हिसका; गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी पोलिसांविरोधात तक्रार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha