भिवंडी : कॅडलॅक... जगभरातील महत्त्वाच्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि उद्यागोपतींची पहिली पसंती असलेली लॅविश आणि लक्झरिअस कार. परदेशातील रस्त्यांवर दिसणारी ही कॅडलॅक कार प्रथमच भारतात अवतरली आहे. तीही टाटा-बिर्ला-अंबानींच्या घरी नाही, तर थेट भिवंडीतल्या दिवा गावी राहणाऱ्या अरुण पाटलांकडे
अरुण पाटील भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती. कॅडलॅक कारची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. या गाडीची किंमत आहे पाच कोटी 50 लाख रुपये. नुसती दिसायलाच भारी नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही कार 'लय भारी' आहे.
कॅडलॅक कारच्या चारही बाजूनं सेन्सर्स आहेत. रस्त्यात खड्डा आला, अपघात होणार असेल, तर कार स्वतःच सावरते.
कारचा स्पीड आणि ब्रेक ऑटोमॅटिकली कंट्रोल होतात. कारच्या मागे-पुढे कॅमेरा आहेत. गाडीत क्लायमेट कंट्रोलही होतं. गाडीत वायफायचीही सुविधा आहे.
इम्पोर्टेड गाड्या सर्वात आधी आयात करण्याची ख्याती कधीकाळी कोल्हापूरकरांकडे होती. पण आता त्यात भिवंडीकरांनी बाजी मारली आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापतींनी आपल्या मुलासाठी गाडी घेणं ही खायची गोष्ट नाही. अरुण पाटील यांचे सुपुत्र साहिल यांना महागड्या गाड्या खरेदी करण्याचा शौक आहे. त्यामुळे हौसेला मोल नसतं, हे म्हणतात तेच खरं. मग काय होऊ दे खर्च!
भिवंडीच्या रस्त्यांवर अवतरली साडेपाच कोटींची कॅडलॅक कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 11:02 PM (IST)
अरुण पाटील भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती. त्यांनी आपल्या मुलासाठी पाच कोटी 50 लाख रुपये किमतीची कॅडलॅक कार खरेदी केली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -