Bhiwandi Fire Incident : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामात अचानक भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत भंगारच्या चार गोदाम आणि चार दुकान असे एकूण आठ गोदामासह दुकान जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये भंगार गोदाम, लाकडी प्लाउड दुकान, हॉटेल, पानटपरी, चहाचे दुकान, यांचा समावेश होता. लागलेल्या आगीचे नेमकं कारण समजू शकलेलं नसलं, तरी ही आग इतकी भीषण होती की या आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण भंगारच गोदाम तसेच दुकान, होटेल जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे आगीच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप (Petrol Pump) होतं आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 


आग लवकरात लवकर आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या व या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये अनेक वाहन देखील आजीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल झाले होते. तसेच आगीची भीषणता लक्षात घेता रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला होता. 


सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही...


या आगीत तब्बल आठ गोदाम व दुकान जळून खाक झाल्याचे घटना घडली असून, या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाण्याची कमतरता भाषत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर तब्बल चार तासानंतर नियंत्रण मिळवल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.


परिसरात दहशतीचे वातावरण....


भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. भंगारच्या गोदामासह एकूण आठ दुकानात आग पसरल्याने परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत होते. विशेष ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच परिसरात बाजूला एक पेट्रोल पंप होते. एवढचं नव्हे तर पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील होते. त्यामुळे परिसरात  दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा धोका टळला. मात्र, या आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा, लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी दोषी