Girish Mahajan : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Anit Shah) यांची काल दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मनसे महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत भाजपचे नेते आणि आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मनसे आणि आम्ही समविचारी आहोत. युती झाली तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदेंचा गट जर आमच्याबरोबर येऊ शकतात तर मनसे आणि भाजपचे विचारसरणी सुद्धा एकच असल्याचे महाजन म्हणाले.
मनसे आणि भाजप यांच्यात युती होण्याची चर्चा सुरु आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले की, युती होईल की नाही मला माहित नाही, मात्र असं झालं तर आश्चर्य वाटायला नको असं महाजन म्हणाले. जागा वाटपा संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेते. राज ठआकरे दिल्लीला गेले आहेत, आमचं पार्लमेंटरी बोर्ड त्यांचं ऐकूण घेतील आणि विचार करतील, असं महाजन म्हणाले.
जागा वाटपासंदर्भात चांगला तोडगा निघेल
महायुतीतल आमच्या तिन्हीही पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. मला वाटतं अजून भरपूर वेळ आहे निवडणुकीला आणखी दोन महिने आहेत. तीन पक्ष आहेत तिघांमध्ये चर्चा सुरु आहे. सर्वांची मागणी आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजे. पण याबाबत आमचं दिल्लीतलं पार्लमेंटरी बोर्ड याबाबत निश्चित चांगला तोडगा काढेल असे गिरीश महाजन म्हणाले. आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढू, एकदिलाने लढू आणि लोकसभा निवडणुकीत या महाराष्ट्रात आश्चर्यकारक असा आकडा तुम्हाला बघायला मिळेल असे महाजन म्हणाले.
मनसेसाठी लोकसभेच्या दोन जागा सोडण्याची शक्यता
काल (19 मार्च) दिल्लीत राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली होती. या भेटीत बंद दाराआड मनसे-भाजप युतीबाबत चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील उपस्थित होते. मात्र, अमित शाह (Amit Shah) आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर येऊ शकला नव्हता. परंतु, महायुती मनसेसाठी लोकसभेच्या एक ते दोन जागा सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघ यापैकी दोन मतदारसंघातून मनसेचा (MNS) उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या:
BJP MNS Alliance: भाजपकडून मनसेला महायुतीच्या चिन्हावर लढण्याची अट, अमित ठाकरे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?