भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2016 09:55 AM (IST)
भिवंडी : भिवंडीतील इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या घटनेतील मृतांचा आकडा 9 वर पोहचला आहे. 42 वर्षीय शाहजहान खुर्शीद आलम अन्सारी, 17 वर्षीय सैफ खुर्शीद आलम अन्सारी, 15 वर्षीय खालिद खुर्शीद आलम अन्सारी आणि 11 वर्षीय शाकीन खुर्शीद आलम अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी दुर्घटनेतील मृतांची नावे : शाहजहान खुर्शीद आलम अन्सारी (42) सैफ खुर्शीद आलम अन्सारी (17) खालिद खुर्शीद आलम अन्सारी (15) शाकीन खुर्शीद आलम अन्सारी (11) मुद्दशीर खुर्शीद आलम अन्सारी (20) आयेशा मोबिन अन्सारी (38) सुफिया शाहनवाक शेख (10) रोहेफ शहा (10)