भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व येथील रामदेव पार्क येथील  महावीर नगर बिल्डींग नंबर 14 या सोसायटीमध्ये एका मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. या मुद्द्याचं वादात रुपांतर झालंच पण यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या हाणामारीचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतोय. या हाणामारीत सोसायटीतील महिलाही हातात बेल्ट घेऊन भांडताना दिसल्या. काही पदाधिका-यांनी थेट सचिवालाच मारहाण केली आहे. याप्रकरणी दोन्ही जणांकडून क्रॉस तक्रारी करण्यात आल्या आहेत.    


रविवार 4 डिसेंबर रोजी रात्री  भाईंदरमधील  महावीर नगर बिल्डींग नंबर 14 या सोसायटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. सोसायटीचे काही सदस्य आणि पदाधिकी यांच्यात जोरदार हाणामारी झाली.  सोसायटीतील हाणामारीत जखमी झालेल्या सेक्रेटरी नितेश झा यांनी माहिती देताना सांगितले की,  सोसायटीचे माजी चेयरमेन हे सोसायटीच्या बनावट स्टँपच्या माध्यमातून अनेक चुकीचे काम करत होते.  याबाबत झा यांनी उपनिबंधकांकडे लेखी तक्रार केली होती. याचा माजी चेयरमेन रवींद्र खरात यांना राग अनावर झाला.


दरम्यान या संबंधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवार 3 डिसेंबर रोजी रात्री काही ओळखीच्या व्यक्तींसह रवींद्र खरात यांनी विनोद सिंग आणि सेक्रेटरी नितेश झा यांच्या  सहकार्यांना मारहाण केली.  विनोद सिंग यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी रवींद्र खरात यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला. या 12 जणांवर कलम 324, 143, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच यामध्ये क्रॉस तक्रार देखील करण्यात आलीये.   मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी देखील  नितेश झा यांच्याविरोधात तक्रार दिलीये. कलम  324, 143, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  


 हेही वाचा :


Yavatmal Crime News : मोबाईल रिचार्जसाठी पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने उचलले टोकाचे पाऊल; चक्क आजीचीच केली हत्या