मुंबई : राज्याच्या सहकार खात्याने सदावर्तेंचं (Gunaratna Sadavarte) पॅनल असलेल्या एसटी बँकेवर (ST Bank) नियुक्तीचा ठपका ठेवलाय. बँकेकडून न निवडण्यात आलेला व्यवस्थापकीय संचालकपदासाठीचा उमेदवार आरबीआयचे निकष देखील पूर्ण न करत असल्याची माहिती सहकार खात्याकडून देण्यात आलीये. याच संदर्भात सहकार खात्याकडून भारतीय रिझर्व्ह बँकेला पत्र देखील लिहिलं आहे. तसेच सहकार खात्याकडून रिझर्व्ह बँकेला एसटी बँकेसंदर्भात लक्ष घालण्याची देखील विनंती केलीये. त्याचप्रमाणे एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक हे गुणरत्न सदावर्तेंचे जवळचे नातेवाईक असल्याची माहिती देखील देण्यात आलीये. या पत्रावर आरबीआय काय उत्तर देणार हे पाहणं गरजेचं ठरेल. 


द स्टेट ट्रान्सपोर्ट को - ऑप बँक अर्थातच एसटी बँकेच्या अडचणी मागील अनेक दिवसांपासून वाढत चालल्या आहेत.  त्याचप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून एसटी बँकेच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण  नवं संचालक मंडळ आल्यापासून बँकेत 466 कोटींच्या ठेवी काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे  बँकेचा सीडी रेशो 95 टक्क्यांच्या वर गेलाय. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान सदावर्तेंमुळेच बँकेच्या अडचणीत वाढ झाल्याचं आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला. 


महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप काय?


बँकेचा सीडी रेशो वाढून तो 95 टक्क्यांच्या वरती पोहोचला आहे. एसटी बँक मोठी आहे, तिचे राज्यभरात 62 हजार सदस्य आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशाने ही बँक उभी राहिली आहे. गुणरत्न सदावर्तेंची हुकुमशाही याला जबाबदार आहे.  राजकीय लाभ व्हावा याचा प्रयत्न त्यांनी केला. सदावर्तेंना व्यवस्थपकीय संचालकाचा कोणताही अनुभव देखील नाही. अनुभव नाही ही गोष्ट नियमाला देखील धरुन नाही, असं एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटलं. 


नवे संचालक मंडळ सदावर्तेंच्या कार्यप्रणालीवर नाराज


सदावर्तेंच्या पॅनलची सत्ता असलेल्या एसटी बँकेच्या म्हणजेच  द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बँकेचं जे नवं संचालक मंडळ आहे, ते बँकेत सुरु असलेल्या कारभारावरुन व्यवस्थापकीय संचालकांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बँकेचे व्यवस्थापकीय संचालक हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे  नातेवाईक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता एसटी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँक काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा :


Bhiwandi : बांधकाम व्यावसायिकाने केली गुंतवणूकदारांची 175 कोटींची फसवणूक, मालमत्ता जप्त करण्याचे गृह विभागाचे आदेश