Mumbai : मुंबई महापालिकेच्या वतीनं 200 ई बसेसची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर ती 400 करण्यात आली होती आणि प्रत्येक्षात मंजुरी मिळेपर्यंत कुठलीही पूनर्निनिविदा  न काढता ती 900 करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बसची संख्या वाढवताना कुठल्याही प्रकारचं पुनर्निवेदन काढण्यात आलेला नाही. या संपूर्ण प्रकरणी आता भाजपचे आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) तक्रार करणार आहेत. यासोबतच ते उच्च न्यायालयात देखील दाद मागणार आहेत.


अधिक माहिती देताना मिहिर कोटेचा म्हणाले की, 'आम्ही मुंबईकरांचा मोकळ्या सुद्धा हवेत श्वास घेण्याचा हक्क शिवसेनेच्या या घोटाळ्याला हिरावून देणार नाही. डिसेंबर मध्ये 200 दुमजली एसी इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर देण्याची निविदा बेस्ट करून काढण्यात आली होती. मात्र प्रस्ताव मंजूर करताना 200 दोनशेच्या ऐवजी अचानक 900 बसेस करण्यात आल्या यामध्ये केंद्राकडून जे बेस्टला 300 कोटी रुपये मिळाले आहेत ते लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी ज्या कंपनीला त्याचं कंत्राट दिलेला आहे. त्यांच्याकडे केवळ कंपनीचे भाग भांडवल म्हणून एक लाख रुपये शिल्लक आहेत. मुळात 2800 कोटींचे कंत्राट केवळ एक लाख रुपये भाग भांडवल असणार्‍या कंपनीला देतातच कसे? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अपेक्षा आहे हे कंत्राट मुंबई महानगरपालिका रद्द करेल अन्यथा या संपूर्ण प्रकरणी त्यांना आंदोलनाला सामोरे जावे लागेल.'


'विशिष्ट कंपनी कोझेस ई मोबिलीटी प्रायेव्हेट लिमिटेड ७०० बसेस पुनर्निविदा न काढतां २८०० कोटी कंत्राट दिले जाते. या कंपनी भागभांडवल एक लाख रुपये आहे. त्या कंपनीसमवेत  बेस्ट १८०० कोटी काम कसे दिले जाते , नेमके कोणासाठी हे केले जाते?' असा देखील प्रश्न मिहिर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. 


केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी मुंबई शुद्ध हवा यासाठी निधी दिला गेला. आता निधी मार्च महिन्यापर्यंच खर्च केला नव्हता म्हणून तात्काळ गडबड करत टेंडर काढले गेले. कायदा पायमल्ली करत कंत्राट दिले.' असा आरोप कोटेचा यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha