Central Railway : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने 19 फेब्रुवारीपासून मेन लाईनवर 36 अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फायदा चाकरमान्यांना होणार आहे. मध्य रेल्वेने मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार आणि ठाणे ते दिवा दरम्यान 5 वी आणि 6 वी लाईन सुरू करण्याच्या अनुषंगाने उपनगरीय सेवांच्या वेळापत्रता हे बदल केले आहेत. 


सुधारित वेळापत्रकाची ठळक वैशिष्ट्ये : 



  • मेन लाईनवर 36 अतिरिक्त सेवा. 

  • मेन लाईनवरील एकूण सेवांची संख्या 858 वरून 894 पर्यंत वाढणार.

  • मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1774 वरून 1810 पर्यंत वाढणार 

  • मेन लाईनवर एकूण वातानुकुलीत उपनगरीय सेवांची संख्या 10 वरून 44 पर्यंत वाढणार म्हणजेच मेन लाईनवर 34 नवीन वातानुकुलीत उपनगरीय सेवा सुरु होणार. 

  • 44 वातानुकुलीत सेवांपैकी 25 वातानुकुलीत सेवा जलद सेवा म्हणून चालतील, म्हणजेच 24 जलद आणि एक अर्ध जलद. 

  • जलद लाईन सेवांची एकूण संख्या 257 वरून 270 पर्यंत वाढणार, म्हणजे 13 आणखी जलद लाईन सेवा सुरु होणार.

  • एकूण धीम्या मार्गावरील सेवांची संख्या 601 वरून 624 पर्यंत वाढणार आहे. म्हणजे आणखी 23 धीम्या मार्गावरील सेवा

  • 5 व्या आणि 6 व्या मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे काही अर्ध-जलद सेवा जलद किंवा धीम्या सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, आज ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गीकेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास करणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या