तळमजला आणि वर तीन मजले असलेल्या या इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. ही इमारत खूप जीर्ण झाली होती. 1958 साली ही इमारत बांधण्यात आली होती.
म्हाडाकडून या इमारतीला सी वन कॅटेगरी म्हणजे इमारत धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र येथे राहणाऱ्या रहिवाशांनी याला कोर्टात आव्हान दिलं आणि स्वतःच्या जबाबदारीवर राहण्याची परवानगी मागितली होती.
मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी हा जीर्ण झालेला इमारतीचा भाग कोसळला. अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.