मुंबई : मुंबईत कालपासून पावसाचा जोर इतका वाढलाय, की गेल्या 12 तासात मुंबईतल्या 16 शहरं आणि उपनगरांमध्ये शंभरहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. खासकरुन टाऊन भागात म्हणजेच दादर, सायन, भायखळा यांचा पुढचा भाग अर्थात मुख्य मुंबईच्या दिशेने पावसाचा जोर अधिक आहे. सायन आणि किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर गांधी मार्केटमधल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं.
असल्फा, अंधेरी, कुर्ला, सायन, दादर भागात सकाळपासून थोड्या-थोड्या विश्रांतीने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे आज मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकही रद्द करण्यात आला होता. मेगाब्लॉक नसल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काहीही परिणाम झाला नाही. मात्र, हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्सहार्बरने प्रवास करावा लागला.
सायन-पनवेल हायवेवर प्रवाशांना मनस्ताप
मुंबईसह नवी मुंबईतही पाऊस कोसळत आहे. याचा सर्वाधिक फटका सायन-पनवेल हायवेच्या वाहतुकीला बसत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दिवसभर आणि रात्रीही मुंबईच्या दिशेने तुर्भे पूल आणि पनवेलच्या दिशेने सीबीडी इथे वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र रस्त्यावर खड्डे पडलेले असल्यामुळे वाहतूक पोलीसही हतबल आहेत. काही दिवसांपूर्वीच अंडर-17 फुटबॉल विश्वचषकासाठी या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र काम किती निकृष्ट दर्जाचं कारण्यात आलं होतं, ते पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दिसत आहे.
मुंबईत 16 शहरं-उपनगरांमध्ये आज 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2018 05:18 PM (IST)
मुंबईत कालपासून पाऊस सुरुच आहे. खासकरुन टाऊन भागात म्हणजेच दादर, सायन, भायखळा यांचा पुढचा भाग अर्थात मुख्य मुंबईच्या दिशेने पावसाचा जोर अधिक आहे. सायन आणि किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर गांधी मार्केटमधल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -