मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करुन आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न इंदिरा गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन लगावला आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचं होतं, त्यावर आमची नाराजी होती. आम्ही ती उद्धव ठाकरे यांना कळवली. भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडला आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.


पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. दिवंगत इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. 1975 सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. ज्या करीम लाला बद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. सोबतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करुन त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवरायांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न दिवंगत इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना आता त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही.



राऊत काय म्हणाले?
पुण्यातील लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात पत्रकारितेबाबत आपले अनुभव शेअर करताना संजय राऊत म्हणाले होते की, 'आज अंडरवर्ल्डमध्ये चिंधीगिरी होत आहे. आम्ही ते अंडरवर्ल्ड पाहिलं आहे, ज्यावेळी डॉन हाजी मस्तान मंत्रालयात जात होता. त्यावेळी लोक त्याच्या स्वागतासाठी बाहेर येऊन उभे राहत असत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील मुंबईचे डॉन करीम लाला यांना पायधुनी येथे भेटत असतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मी अशी व्यक्ती आहे जिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला देखील दम दिला होता.'

राऊतांचे स्पष्टीकरण -
संजय राऊत यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्याने त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'करीम लालाची भेट सर्व राष्ट्रीय नेते घेत असत. ते अफगाणिस्थानाहून आलेल्या पठाणांचे नेते होते. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते त्यांची भेट घेत असतं.' राऊत म्हणाले की, 'इंदिरा गांधीही एक पठाण नेता म्हणूनच त्याला भेटत असत. करीम लाला याच्या ऑफिसमध्ये अनेक नेत्यांचे फोटोही लावलेले होते. खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत करीम लाला काम करत होता.'

संबंधित बातम्या -

Sanjay Raut | काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबद्दल वक्तव्य मागे | ABP Majha