बदलापूर:  बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur Minor Abuse Case) झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी बदलापूर पोलीस काल (मंगळवारी) उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली आहे.


बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, या प्रकरणात निलंबनाच्या कारवाई म्हणून या महिला अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे. तसेच या प्रकरणासाठी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालातून चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम शाळेचे विश्वस्त करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान आरोपी अक्षय शिंदे यांचे कुटुंबीय आपल्या संपर्कात नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केला आहे. शिंदे कुटुंबीयांना पुढील सुनावणीला दूरचित्रप्रणालीद्वारे न्यायालयात उपस्थित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल न केल्यामुळं आणि तपासात टाळाटाळ केल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांना विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांचं दोन वर्षांची वेतनवाढही थांबवण्यात आली आहे.  त्याचबरोबर या प्रकरणी मृत आरोपी अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेचे विश्वस्त करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 


बदलापूर अत्याचाराचे नेमके प्रकरण काय आहे? 


बदलापूरमध्ये काही महिन्यांपुर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळापर्यंत चालले होते. या प्रकरणातील आरोपील आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.