Badlabpur Case : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला गेला. दरम्यान, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शाळेंच्या संस्था चालकांना उद्या हटवण्यात येणार आहे. या शाळेचा कारभार पाहण्यासाठी संबंधित शाळेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. 


शिक्षण विभागाला आज रात्री बदलापूर प्रकरणातील प्राथमिक अहवाल प्राप्त होणार आहे. संस्था चालकांसोबतच या विभागात असणारे शिक्षणाधिकारी यांच्यावर देखील कारवाईचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षणाधिकारी यांच्याकडून देखील दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय काय म्हणाले? 


दीपक केसरकर म्हणाले, मी बदलापूरला जाऊन आलो आहे. विद्यालयाचे ट्रस्टी, मुख्यध्यापक, तसेच ज्या संस्थेने वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. या सर्वांना भेटून आलो आहे. मी आंदोलकांना देखील भेटणार होतो, त्यामुळे तिथं झालेला लाठीचार्ज झाला नसता.  सदर घटना 12 तारखेला घडली होती. माञ शाळेने ही घटना दाबली होती. तिथं असणाऱ्या पीआय यांनी देखील कारवाईमध्ये दिरंगाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल.  


संबंधित संस्था चालकांनी अपली बदनामी होईल म्हणून प्रकरण दाबून ठेवलं 


आज मी सर्व अहवाल मागवला आहे. जी कारवाई करायची आहे ती तत्काळ केली जाईल.  आज रात्री अहवाल आल्यानंतर सबंधित संस्थेत प्रशासक नेमण्याबाबत निर्णय होईल. तसे अधिकार आम्हाला आहेत. संबंधित संस्था चालकांनी अपली बदनामी होईल म्हणून प्रकरण दाबून ठेवलं आहे. ज्या डॉक्टरांनी सबंधित मुलीवर उपचार करायला नकार दिला त्यांच्यावर देखील कारवाई होईल. या मुलीवर उपचार झाले नाहीत. कोणतेही उपचार न होता ही मुलगी पोलीस ठाण्यात बाकडावर पडून राहते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Badlapur School Case : आता शाळेतही मुली सुरक्षित नाही? कोलकात्यानंतर आता बदलापूरमध्येही तेच; पद्धत वेगळी, पण अत्याचार सारखेच