Badlapur News : चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर आज हजारोंच्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर उद्रेक केलाय. दरम्यान, बदलापुरातील आंदोलनामुळे मुंबईतील लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. 


मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथपर्यंत सुरु 


बदलापुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अंबरनाथपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून याबाबतची अनाऊन्समेंट करण्यात आली आहे. कर्जत मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या अंबरनाथपर्यंत सुरु आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. बदलापूर स्थानकावरील आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


मध्य रेल्वेची वाहतूक
अंबरनाथपर्यंत सुरु,
रेल्वेची अनाऊन्समेंट
--------
कर्जत मार्गावरील अप 
आणि डाऊन मार्गावरील 
गाड्या अंबरनाथपर्यंत सुरु
------
लांब पल्ल्यांच्या गाड्या
दुसऱ्या मार्गाने वळवण्यात
आल्या
-----------
बदलापूर स्थानकावरील
आंदोलनामुळे मध्य रेल्वेची
वाहतूक विस्कळीत


मध्य रेल्वेची सध्या अतिशय वाईट परिस्थिती आहे. अजूनपर्यंत तरी अंबरनाथपर्यंतचं लोकल धावत आहेत. अंबरनाथच्या पुढे कर्जत असले किंवा खोपोली या मार्गावर लोकल पुढे जात नाहीये. सर्व लोकल सध्या कल्याण ते अंबरनाथ या सेक्शनमध्ये सध्या सुरु आहेत. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यानच्या 30 लोकल गाड्या रद्द  करण्यात आल्या आहेत. 


मध्य रेल्वेच्या 30 लोकल गाड्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द  


11 लोकल गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत 


मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रीरूट करून व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे 


तब्बल 3 तास बदलापुर स्थानकात एक्सप्रेस थांबली होती 


अंबरनाथ पुढील वाहतुकीसाठी ज्यादा बसेसची मागणी मध्य रेल्वेने केली आहे


11 लोकल गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत.  मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रीरूट करून व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे. तब्बल 3 तास बदलापुर स्थानकात एक्सप्रेस थांबली होती.  अंबरनाथ पुढील वाहतुकीसाठी ज्यादा बसेसची मागणी मध्य रेल्वेने केली आहे. 


पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय


बदलापूर रेल्वे स्थानकात परिस्थिती जैसे थे आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी रेल्वे स्थानकांवर जमण्यास सुरुवात केली होती. अद्याप आंदोलक मागे हटलेले नाहीत. पोलिसांसह सर्व यंत्रणा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,मात्र आंदोलक हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली, बदलापुरात आंदोलकांचा रुद्रावतार; 'फाशी द्या'च्या घोषणा सुरुच