मुंबई : 'लालबागच्या राजा'च्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या लिलावात सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून दोन स्कूटर आणि दोन बाईक्सचाही समावेश आहे. दागिने लिलावानंतर पुन्हा भक्तांकडेच जाणार आहेत. या दागिन्यांचा लिलाव 19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजवर होणार आहे. यामध्ये कोणीही भाविक यामध्ये सहभागी होऊ शकतो.
लालबागच्या राजाला अंदाजे 6 कोटी रुपये दान मिळाले आहेत. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता लिलावाला सुरुवात होईल. 1.162 किलो वजनाची सोन्याची पावलं ही लालबागच्या राजाला मिळालेल्या दानापैकी आकर्षणाचा विषय आहेत. याची किंमत 39 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
त्याशिवाय 123 ग्रॅम आणि 42 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी एक नेकलेस लिलावात असतील. दरवर्षी अनेक चेन आणि अंगठ्या राजाला अर्पण केल्या जातात, अशी माहितीही मंडळातील एका पदाधिकाऱ्याने दिली. 100 ग्रॅम वजनाची चार, तर 50 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटं लालबागच्या राजाला दान करण्यात आली आहेत.
'बजरंगी भाईजान'ची चेन

बजरंगी भाईजान चित्रपटात सलमान खानची विशिष्ट पेंडंट असलेली चेनही लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आली होती. ही चेनही लिलावात पाहायला मिळेल. 21 ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या चेनसाठी सलमानचे चाहते बोली लावतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पहिल्या चार दिवसात लालबागच्या राजाचरणी तब्बल 3.20 कोटींची रक्कम दान झाली होती. त्यानंतर पुढच्या तीन दिवसात यात घट झाली. पुढच्या तीन दिवसांत 80 लाख रुपये जमा झाले. पहिल्या सात दिवसांतील दानाचा आकडा चार कोटींच्या घरात होता.

जमा झालेल्या राशीत केवळ देशी चलनच नाही तर परकीय चलन, सोने-चांदीच्या भेटवस्तूही बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. बाप्पांचे चरण, हार, मुकूट, उंदीर, बजरंगी भाईजानची सोनसाखळी असे विविध दागदागिने अर्पण करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या


 

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्या-चांदीचा ढीग


'लालबागचा राजा'च्या चरणी चारच दिवसात कोट्यवधींचं दान


अथांग अरबी समुद्रात लालबागचा राजा विसावला!


अरबी समुद्रात लालबागच्या राजाचं हायटेक विसर्जन


लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस आणि कार्यकर्ते भिडले