उल्हासनगर/अंबरनाथ : मनसेच्या विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर आज (8 ऑक्टोबर) अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले. यात शेलार यांच्या हाताला दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं.


मनोज शेलार हे आज सकाळी अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आले होते. यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात शेलार यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अनेक घोटाळे उघड केल्यामुळेच आपल्यावर हा हल्ला झाल्याचा दावा मनोज शेलार यांनी केला आहे.


दरम्यान या प्रकरणी सध्या अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगरमधील राणी लक्ष्मीबाई ही शाळा पटसंख्या नसल्याने आणि मोडकळीस आल्याने बरीच वर्षे बंद होती. काही भूमाफियांनी या शाळेचं बांधकाम तोडून शाळेतील सर्व सामान नेलं. तसंच तिथे नवीन बांधकाम करण्यास सुरुवात केली. यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी या प्रकाराची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती.


मुंबई : मालाडमधील शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या