मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी गेल्या एका आठवड्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी 'खोट्या' प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला. रिपब्लिक चॅनलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत असलेल्या गोस्वामी यांनी सांगितले की, 'उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय.'
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्याला झालेली अटक ही 'अवैध' असल्याचं सांगत अर्णब गोस्वामी यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली.
अर्णब गोस्वामी म्हणाले की, 'तळोजा कारागृहात त्यांची पोलिसांनी तीन टप्प्यांत चौकशी केली. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही.' ते म्हणाले की, 'खेळ आता सुरु झाला आहे.' गोस्वामी म्हणाले की, 'ते प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरु करणार आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही त्यांची उपस्थिती आहे.'
पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवत अर्णब गोस्वामी म्हणाले की, 'मी कारागृहातूनही चॅनल सुरु करणार आणि तुम्ही (ठाकरे) काहीच करू शकणार नाही.' तसेच गोस्वामी यांनी अंतरिम जामीन दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत.
पाहा व्हिडीओ : अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विशेष सरकारी वकिलांची नाराजी
अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाचा दिलासा
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अर्णब गोस्वामी यांना दिलासा नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाली असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली.
अर्णब गोस्वामी यांना तळोजात का हलवलं होतं?
अलिबाग कारागृहाच्या कैद्यांसाठीच्या विलगीकरणातून अर्णब गोस्वामी यांना रविवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आलं. गोस्वामी यांना ज्या नगर परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलं होतं तिथं कोठडीत ते मोबाईल वापरताना आढळून आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजात हलवण्याचा निर्णय जेल प्रशासनानं घेतला.
प्रकरण काय आहे ?
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गेल्या बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना थेट अलिबाग कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या निर्णयाला आव्हान देत ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गोस्वामींच्यावतीने हायकोर्टात अंतरीम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर विस्तृत सुनावणी घेत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :