मुंबई : अँटिलियाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएसमोर दररोज नवनवे खुलासे होत आहेत. महाराष्ट्र एटीएस स्कॉर्पिओ गाडी चोरीचा तपास करत असता, एटीएसला अशी माहिती मिळाली होती मनसुख हिरण यांची चोरीला गेलेली गाडी मुंबई पोलीस मुख्यालयात उभी होती, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. 


याच तपासादरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्या कोणकोणत्या गाड्या आयुक्त कार्यालयात आल्या होत्या त्याच्या रजिस्टरची मागणी केली. एटीएसने आयुक्त कार्यालयाला याबाबत लेखी स्वरुपात विचारणा केली होती. काही दिवसांनी एटीएसला आयुक्त कार्यालयाकडून तोंडी सांगण्यात आलं की, फेब्रुवारी महिन्याची नोंद सापडत नाही.


ही बाबत अतिशय आश्चर्यचकित करणारी होती. अखेर असं काय घडलं की, फेब्रुवारी महिन्यात कोणकोणत्या गाड्या आयुक्त कार्यालयात आल्या याची नोंद असलेली बुक गहाळ कशी होऊ शकते? की कोणीतरी जाणीवपूर्वक ती गायब केली आहे?


एटीएसने आयुक्त कार्यालयाला सांगितलं आहे की, फेब्रुवारी महिन्याची नोंद गायब झाल्याची माहिती लेखी स्वरुपात द्या. मात्र आयुक्त कार्यालयाने आतापर्यंत एटीएसला कोणत्याही प्रकारचं लेखी उत्तर दिलेलं नाही.


एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, यंत्रणेने हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याकडे नोंद केला आहे, जेणेकरुन याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवरही कारवाई करता येईल.


एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जेवढे कर्मचारी तैनात असतात त्यांचा इनचार्ज पोलीस निरीक्षक स्तराचा अधिकारी असतो, जो स्थानिक सशस्त्र विभागातील असतो. जेव्हा एटीएस फेब्रुवारी महिन्यात इथे आलेल्या गाडीचा तपास करत होती, त्याचवेळी त्या पीआयने आपली वैयक्तिक डायरी दाखवली ज्यात ते आपल्या दिवसभरातील कामकाजाची नोंद ठेवत असत.


त्यांनी एटीएसला सांगितलं की, आयुक्त कार्यालयाच्या नोंदीत जे लिहिलेलं असतं तेच त्यांच्या या वैयक्तिक डायरीतही लिहिलेलं आहे. मात्र एटीएसने त्या पीआयची वैयक्तिक डायरी आपल्या तपासात समावेश केलेला नव्हता.


प्रश्न अतिशय गंभीर आहे जर आयुक्त कार्यालयातून फेब्रुवारी महिन्यात कोणकोणत्या गाड्या आल्याची नोंद गायब तरी कशी झाली आणि जर गायब झाली असे तर यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार?


17 फेब्रुवारीला मनसुख हिरण यांची स्कॉर्पिओ कार विक्रोळीहून चोरीला गेली होती. त्यानंतर ती गाडी सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सोसायटीमध्ये उभी केली, जिथे ती गाडी 20 फेब्रुवारीपर्यंत होतं. मग 21 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत ती गाडी आयुक्त कार्यालयात उभी होती.