मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून झालेल्या चौकशी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये ही स्फोटकं आढळली होती. तसेच एक इनोव्हा कारही या परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. या इनोव्हा कारमधून पीपीई किट घालून एक व्यक्ती खाली उतरला होता. एनआयए या व्यक्तीचा शोध घेत आहे. ती व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयच्या टीमला आहे.
सचिन वाझे यांना पीपीई किट घालून सीसीटीव्ही दिसणाऱ्या व्यक्ती कसा चालतो त्याप्रमाणे तपासलं जाणार आहे. सचिन वाझे हे सध्या 25 मार्चपर्यंत एनआयच्या कोठडीत आहेत. एनआयएच्या मते सचिन वाझे या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. सचिन वाझे हे या सर्व कटाचा छोटासा भाग आहे, असं सूत्रांच्या माहितीतून कळत आहे.
Exclusive : ...म्हणून सचिन वाझेंना अटक, इनोव्हाच्या नंबर प्लेटचा झोल? CCTVमधून महत्वाची माहिती
सचिन वाझेंच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध घेणे एनआयए समोर मोठं आव्हान आहे. सचिन वाझे यांच्याकडून या मास्टरमाईंडचं नाव काढणे एनआयएसाठी महत्त्वाचं आहे. सचिन वाझे यांच्या अटकेप्रकरणी आता उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांचे वकील सनी पुनमिया यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाझे यांची अटक बेकायदेशीर असून त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा देखील नाहीये. यावर एनआयने न्यायालयात कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करत हा मोठा कट असून यामध्ये अटक आणि रिमांड गरजेचं असल्याचं सांगितलं.
Antilia Explosives Scare | अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्हीत कैद
सचिन वाझेंच्या अटकेवरुन 'सामना'तून टीकास्त्र
पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे , हे आश्चर्यच आहे, असं सामनात म्हटलं आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली , याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, असंही लेखात म्हटलं आहे.