Aamshya Padavi joins Shinde Group : ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Aamshya Padavi ) यांनी आज (दि.17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना आमश्या पाडवींना (Aamshya Padavi ) अश्रू अनावर झाले आहेत. "मी ज्या विभागात राहतो. तो जिल्हा नंदुरबार जिल्हा आहे. त्या ठिकाणी कोणतीच काम होत नव्हती.  विकास होत नव्हता म्हणून कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण सत्तेमध्ये जायला हवं म्हणून आज मी प्रवेश केला आहे", अशी प्रतिक्रिया आमश्या पाडवी (Aamshya Padavi ) यांनी शिंदे गटात प्रवेश करताना व्यक्त केली. 


"मी कोणावर नाराज नाही मात्र निधीची कमतरता होती. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भरपूर निधी देण्यात येईल. ज्या दिवशी मी निवडून आलो त्याच दिवशी तुमच्या पक्षाची वाट लागली म्हणून मी प्रचंड रडलो होतो, असे व्हायला नको होते. आज पण मी कोणावर टीका करत नाही मी नाराज नाही विकास होण्यासाठी मी प्रवेश करत आहे", असेही आमश्या पाडवी (Aamshya Padavi ) यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. 


पण ज्या पक्षांकडे शिवसैनिक नाहीत ती शिवसेना कशी?


पक्षप्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले आमदार पाडवी (Aamshya Padavi ) यांचे मी स्वागत करतो. त्यांचा मुलगा, पत्नी आणि पदाधिकारी आले आहेत. शिवसेनेत सामील झाले आहेत. पाडवी हा आमचाच माणूस आहे. आम्ही जाता जाता त्याला मतदान केले होते. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडेच आहे. अनेक जण म्हणतात चुकीचे आहे. पण ज्या पक्षांकडे शिवसैनिक नाहीत ती शिवसेना कशी? खरी शिवसेना आपणच आहोत, असं शिंदे यांनी नमूद केलं. 


2019 मध्ये चुकीचा निर्णय कोणी घेतला 


मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) पुढे बोलताना म्हणाले, चुकीचा निर्णय 2019 मध्ये कोणी घेतला हे जनतेने दाखवलय. नीलम गोऱ्हे यांच्यापासून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत आले आहेत. पाडवी यांनी बरोबरचं सांगितलय की, ज्यांच्या सोबत लढलो त्याच काँग्रेससोबत आपण कसे काम करायचं. अनेक जण मला  म्हणाले, आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत. पण एकच दरवाजा उघडा होता तो म्हणजे युतीचा असंही शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : आमश्या पाडवी हा आमचाच माणूस, तो आमच्यात होता, जाता जाता त्याला मतदान करून गेलो : एकनाथ शिंदे