राज्य सुजलाम-सुफलाम व्हावं, हीच बाप्पा चरणी प्रार्थना: अमृता फडणवीस
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 11:50 AM (IST)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर जाऊन विसर्जनासाठी येणाऱ्या बाप्पांचं स्वागत केलं. 'बाप्पाच्या कृपेनं राज्य सुजलाम सुफलाम व्हावं.' अशी प्रार्थना यावेळी अमृता फडणवीस यांनी केली. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरच्या बाप्पाचं महापौर बंगल्यातील हौदात विसर्जन केलं. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः महापौर स्नेहल आंबेकर हजर होत्या. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजाही उपस्थित होत्या. तर दुसरीकडे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काल सकाळपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. आज सकाळपर्यंत जवळजवळ ५० हजारापर्यंत बाप्पांच्या मुर्तीचं विसर्जन करण्यात आलं.