मुंबई : भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमीत साटम (Ameet Satam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सर्वात मोठा आरोप केला आहे. बेकायदा लोकांना मुंबईत (Mumbai) वसवून शहराचा रंगच बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव असल्याचं गंभीर वक्तव्य अमीत साटम यांनी एबीपी माझाच्या खास मुलाखतीत केला. बाहेरच्या लोकांना बनावट ओळखपत्र देऊन मतदार तयार करण्याचं मोठं षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर साटम यांच्या या आरोपांमुळे खळबळ माजण्याची शक्यता आहे.
Ameet Satam On Uddhav Thackeray : काय म्हटलंय अमीत साटम यांनी?
उद्धव ठाकरेंवर आरोप करताना अमीत साटम म्हणाले की, "मतांच्या लांगुलचालनाकरता, स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. या राजकारणाचा मुंबई शहराला मोठा धोका आहे. ज्या प्रकारे पश्चिमी देशातल्या काही शहरांचा रंग बदलला आहे, त्या प्रकारे मुंबईचा रंग बदलण्याची शक्यता आहे. त्या रंग बदलण्याच्या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरेंचा मोठा हात आहे."
BMC Elections News : मुंबईकरांनी सावध राहावं
अवैध बांधकाम केले जातात, त्या आधारे आधारकार्ड तयार केले जातात, मतदान कार्ड तयार केले जातात. नंतर मतदान केलं जातं. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी भूमिका असते. म्हणूनच मुंबईकरांनी यापासून सावध राहिलं पाहिजे.
Mumbai BJP President : उद्धव ठाकरेंनी मुंबईला लुटलं
अमीत साटम म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांनी मुंबईला लुटलं. आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर, 2022 नंतर आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबई शहरातील रस्ते आम्ही सिमेंटचे केले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची शिक्षा त्यांना महापालिका निवडणुकीत मिळणार."
उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला बाण आता निघून गेला आहे, त्यांच्याकडे आता फक्त खान उरला असल्याची टीका अमीत साटम यांनी केला. येणाऱ्या कालावधीमध्ये, मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करणारा, त्यांच्या मनातील महायुतीचा महापौर होणार असा विश्वास अमीत साटम यांनी व्यक्त केला.
कोण एकत्र येतंय आणि कोण एकत्र येत नाही याला काही महत्व नाही. गेल्या तीन चार वर्षात मुंबईचा विकास कोण केला, बीडीडी वरळी चाळीतील लोकांना घरे कोण दिली, अटल सेतू कुणी केला, यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोठा आहे असं अमीत साटम म्हणाले.