मुंबई : राज्यातील सर्व खात्यातील अधिकारी येत्या 5 जानेवारीला सामुदायिक रजेवर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाकडून मिळाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सामुदायिक रजा आंदोलन होणार असल्याने राज्यातील जनतेला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
या एका दिवसाच्या सामुदायिक रजा आंदोलनात दीड लाख अधिकारी रजेवर जाणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आला आहे.
येत्या जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू व्हावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा असावा आणि सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्षे करण्यात यावी तसंच रिक्त पदंभरण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातील सर्वच खात्यातील अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.