पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याआधी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. राम मंदिर बांधण्याची मागणीही यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांनी केली.

Continues below advertisement

उद्धव ठाकरे राम मंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावर काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष आहे. मात्र युतीच्या मुद्द्यावर काय बोलणार याची जास्त उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र घोषणाबाजीवरुन शिवसैनिक युतीसाठी उत्सुक नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

'रावसाहेब दानवे यांचं करायचं काय, खाली डोके वर पाय', 'राम मंदिर झालंच पाहिजे' अशी घोषणाबाजी स्थानिक शिवसैनिकांनी यावेळी केली.

Continues below advertisement

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

संंबंधित बातम्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर

कसा असेल उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा?